अकोले तालुक्‍यातील 10 जण तडीपार; माजी सरपंचासह दोन भावांचा समावेश

अकोले  – अकोले तहसील कार्यक्षेत्रात असणाऱ्या 10 जणांना आगामी 10 दिवसांच्या काळासाठी तडीपार केले आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. यात एका सरपंचाचा व दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.

परखतपूर या गावाचे सरपंच दत्तात्रय दगडू वाकचौरे यांच्याबरोबरच अमोल शेटीबा पवार व रमेश शेटीबा पवार (रा. शाहूनगर, अकोले) या दोन भावांचा त्यात समावेश आहे. महेबूब लालभाई बेग (काझीपुरा, अकोले), प्रकाश अशोक रूपवते (महात्मा फुले चौक, अकोले), नंदा भाऊसाहेब खरात (कोतूळ), बाळू निवृत्ती सदगीर (खिरविरे), सुभाष रामनाथ जोरवर (देवठाण), अनिल बाबू पटेल (ब्राह्मणवाडा) व विकास विठ्ठल पवार (वडारवाडी, अकोले) या सर्वांना अकोले तहसील हद्दीतून तडीपार केले आहे.

आगामी काळात गणेशोत्सव व मोहरम हे दोन महत्त्वाचे सण व उत्सव एकत्र येत आहेत. या सर्व 10 जणांचा या पूर्वी सामाजिक उपद्‌व्याप लक्षात आलेला आहे. त्यांच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 144 (2) नुसार कारवाईचा बडगा उचलला गेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)