प्रमुख कार्यवाह सतीश लोटके तर प्रवक्‍ता अविनाश कराळे

नगर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नगर जिल्हा शाखेची कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे सहकार्यवाह तथा नगर शाखेचे अध्यक्ष सतीश लोटके यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक झाली.

मध्यवर्ती शाखेच्या महत्वाच्या पदावर कार्य करताना दोन्ही ठिकाणी न्याय देता येत नसल्या कारणाने त्यांनी नगर शाखेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. लोटके यांच्या रिक्‍त झालेल्या अध्यक्ष पदावर अमोल खोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून खोले यांनी पुढील प्रमाणे नूतन कार्यकारिणी जाहिर केली असल्याचे शशिकांत नजान यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, अध्यक्ष – अमोल खोले, उपाध्यक्ष (प्रशासन) -ऍड. दिपक शर्मा, उपाध्यक्ष (ऊपक्रम) – चैत्राली जावळे, प्रमुख कार्यवाह – सतीश लोटके, कार्याध्यक्ष – शशिकांत नजान, कोषाध्यक्ष – तुषार देशमुख, सहकार्यवाह – तुषार चोरडिया, शेखर वाघ, संजय लोळगे, संघटक – सुशांत घोडके, अभिजित दरेकर, प्रवक्‍ता – अविनाश कराळे, कार्यकारीणी सदस्य – संजय घुगे, अनंत जोशी, सतीश शिगंटे, श्‍याम शिंदे, क्षितिज झावरे, रितेश सांळुके, राजेंद्र क्षिरसागर, शिवाजी शिवचरण,अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)