अॅड.शेखर दरंदले यांची वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

नगर  – शहर वकिल संघटनेच्या गुरुवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड.शेखर दरंदले यांनी बाजी मारली असून त्यांना 515 मते मिळाली आहेत. तर उपाध्यक्षपदी ऍड.गजेंद्र पिसाळ (556 मते) निवडूण आले आहेत. तसेच सचिवपदी अॅड. प्रसाद गंगार्डे, महिला सचिवपदी अॅड. गितांजली पाटील (369 मते) निवडूण आले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा मतमोजणी संपल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

यावेळी वकिल संघटनेची निवडूण आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे – सहसचिव अॅड.सुनिल आठरे, कार्यकारणी सदस्य अॅड.सुधाकर पवार, अॅड.सुभाष वाघ, अॅड.प्रणवकुमार आपटे,अॅड.महेश शिंदे, अॅड.बबन सरोदे,अॅड.कश्‍यप तरकसे, अॅड. अनुजा मोहिते आदी. या निवडणूकसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.अरुण भालसिंग, अॅड.भाऊसाहेब घुले, अॅड. संदिप शेळके, अॅड.कैलास कोतकर आदींनी कामकाज पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)