नेवासे येथील वकील पठाण हत्येचा खटला नगरच्या न्यायालयात

खटला निश्‍चितीसाठी 17 नोव्हेंबरची तारीख

नगर  – नेवासे येथील वकील रियाज जमशेद पठाण (वय 49) यांच्या खून खटल्याच्या निश्‍चितीसाठी 17 नोव्हेंबरची तारीख जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या खून खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. हा खटला श्रीरामपूर न्यायालयातून ऑक्‍टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात नगर जिल्हा न्यायालयाकडे वर्ग झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा न्यायालयासमोर सरकारतर्फे आज जिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश पाटील हजर होते. नेवासे तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या पोलिस ठाण्यासमोरच वकील रियाज जमशेद पठाण यांची गोळ्या घालून हत्या केली होती. ही घटना सप्टेंबर 2013 मध्ये घडली. हत्येप्रकरी पोलिसांनी सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पठाण यांच्या हत्याप्रकरणी त्यांचा मावस भाऊ आसिफ इलायतखान पठाण याने फिर्याद दिली आहे.

कुख्यात लष्करे गॅंगमधील शार्पशूटर प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे, रामेश्वर भगवान गाडे, चौरंगी गोरक्षनाथ लष्करे, पवन नरुला, सादिक बशीर शेख, सचिन चंदू चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

खुनासाठी वापरलेले देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर अण्णा लष्करे याने मृत्यूपूर्वी आरोपीला दिले होते, असे प्राथमिक तपासात समोर आले होते. तहसील कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या हत्येचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रफितीत पठाण यांच्यावर गोळया झाडतानाही दिसतो आहे.

ही चित्रफीत पोलिसांनी ताब्यात आहे. अशा या संवेदनशील हत्येची सुनावणी श्रीरामपूर येथील न्यायालयातून नगर जिल्हा न्यायालयात वर्ग झाली आहे. खून खटल्याच्या निश्‍चितीसाठी 17 नोव्हेंबरची तारीख जिल्हा न्यायालयाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)