डॉक्‍टरांच्या लक्‍झरीचा अपघात; एक ठार, 30 जखमी

नगर – मुंबईमधील “टाटा कॅन्सर’ हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्या लक्‍झरी बसला आज पहाटे चारच्या सुमारास केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक जागीच ठार झाला तर अन्य 30 डॉक्‍टर जखमी झाले. जखमींना नगरमधील साखगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईवरुन वेरूळकडे निघालेल्या लक्‍झरी बसमध्ये एकूण 40 डॉक्‍टर प्रवास करत होते. औरंगाबादमध्ये होणाऱ्या मेडिकल कॉन्फरन्ससाठी हे डॉक्‍टर निघाले होते. केडगाव बायपासजवळ भरधाव वेगात असणारी लक्‍झरी बस पाठीमागून कंटेनरला धडकली.या भीषण अपघातामध्ये अर्ध्या लक्‍झरीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्‍टर गंभीर जखमी झाले आहेत.

दिपांजली अडळूकर, भाविन विसारिया, आशिष भांगे, स्वाती चुग, हर्षित के, देवांजली दत्ता, मनिष मदाने, आस्फिया खान, त्रिरंजन बास, दीपक कुमार, जाहीद मुलानी, सायोग डे, सचिता पाल, आकांक्षा अनुप, जिन्स मॅथ्यू, निष्ठा सेहरा, प्रशांत नायक, पल्लवी खुरूड, जिमी मंजली, प्राची सावंत, अजय शशीधरन, अनुजकुमार, समर्पिता मोहंती, प्रारब्ध सिंग, अमेरेंद्र कुमार, सुचिता पॉल, वेदांत मूर्ती, गार्गी मुळे, सागर गायकवाड, केतकी अडसुळ, उन्मेष मुखर्जी, कस्तुरी वरवा, उपासना सक्‍सेना, सचिन आनंद, निखिल कल्याणी, जिफ्मी जोस, निशिता सेहरा, रवी शंकर दास हे किरकोळ जखमी आहेत.

कंटनेरला बसची धडक बसल्यानंतर बस कंटनेरच्या पाठीमागील बाजूस अडकली यावेळी बस 50 फुटापर्यंत कंटनेरने ओढत नेली ही बाब कंटनेरचालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने कंटनेर थांबविले यावेळी या अपघातात बसच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाल्याने चालक टेरिंगच्या मध्ये अडकून मृत्यू झाला होता जखमी झालेल्या क्‍लिनरने बसच्या दरवाजाच्या काचा तोडून जखमींना बाहेर काढले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)