नगर-दौंड महामार्गावर अपघात एक ठार; दोघे गंभीर

श्रीगोंदे : नगर-दौंड महामार्गावर मढेवडगाव शिवारात सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चारचाकी वाहनाच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. भगवान अशोक भिल (रा. यावलसाखळी, ता. यावल, जि. जळगाव) असे मयताचे नाव असून या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

याबाबत माहिती की, जळगाव जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार चारचाकी गाडीने बारामतीच्या दिशेने जात होते. सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी मढेवडगाव शिवरातून जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की, वाहनचालकाशेजारी बसलेले भगवान अशोक भिल हे जागीच ठार झाले. या अपघातात मेघराज तंवर व अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुभाजक नसल्याने अपघात

नगर-दौंड महामार्गाचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहनांची वेगमर्यादा वाढली आहे. त्यातच रस्त्याला दुभाजक नसल्याने नवीन वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही. हा अपघात समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने झाला असल्याची माहिती समजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)