दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

रांजणगाव देशमुख  – कोपरगाव तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख येथील नंदू चिमाजी वर्पे (वय 35) यांचा घोटी-सिन्नर रस्त्यावर शेणीत फाटा येथे दुचाकीला अपघात झाल्याने मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.3) सकाळी अकराच्या सुमारास झाला.

कोपरगाव तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख येथील नंदू चिमाजी वर्पे हे संगमनेर येथील मालपाणी उद्योगसमूहात नोकरीस होते. ते शनिवारीकामानिमित्त इगतपुरीकडे जात होते. दरम्यान घोटी-सिन्नर रस्त्यावर शेणीत फाटा येथे त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघातात वर्पे यांच्या डोक्‍यास व पायाला जोराचा मार लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांना उपचारासाठी धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी वर्पे यांना मृत घोषित केले. नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री 8 वाजता रांजणगाव देशमुख येथे वर्पे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)