नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : ‘आम आदमी’ला आला नगरचा कळवळा

नगर विकासासाठी देशभक्त व आपने युती केल्याचा दावा

नगर – आम आदमी पक्षाचा संघर्ष सर्वश्रूत आहे. देशात या संघर्षाची प्रस्थापितांनाही जाणिव आहे. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आम आदमी पक्ष नगर विकासासाठी पर्यायच ठरू शकतो. या निवडणुकीत आम आदमी नगरमध्ये परिवर्तन घडवेल, असा पक्षाचा विश्‍वास आहे. तो कितपत खरा ठरतो हे 10 डिसेंबरलाच कळेल.

-Ads-

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरमध्ये आहेत. इतरवेळी कधी न दिसणारा हा आम आदमी निवडणुकीच्या दिवशी समोर आला आहे. या आम आदमी खरच प्रस्थापितांना आवाहन देईल का, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आप व देशभक्त पक्षाने युती होऊन अमदनगर सुधार आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्ही पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक ब्रिगेडियर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पटवर्धन चौक जवळ झाली आहे. भारतीय देशभक्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शिवाजी डमाळे यांनी आप व देशभक्त पक्षाचे वैचारिक पातळीवर एकत्र आल्याचे सांगितले.

देशभक्त पक्षाचे प्रवक्ते मेजर रावसाहेब काळे, प्रसिद्धीप्रमुख पोपट बनकर, ऍड. महेश शिंदे, सागर अलचेट्टी, सुभेदार भाऊसाहेब आंधळे, रजनी ताठे, आम आदमी पक्षाचे योगेश खेंडके, दीपक वर्मा, बाळासाहेब लांडे, सचिव सुभाष तंवर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य किरण उपकारे, आपचे युवा आघाडी कायदे सल्लागार ऍड.सुनील आठरे, ऍड.जावेद काझी, प्रसाद सैंदाणे, संपत मोरे, दिलीप घुले, डॉ.किसन रजपुत, निसारभाई बाटलीवाले आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)