‘उच्च ध्येय ठेवल्यास यश निश्‍चित’ 

शेवगाव- आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले.

शेवगाव – तरुण ही देशाची संपत्ती असते. स्पर्धेच्या युगात तुम्ही जन्माला आलेले आहात. मात्र तुम्हांला संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील मुलांत आत्मविश्वासाचा अभाव असतो. एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. परीक्षेत आपला ज्ञानाचा पाया भक्कम नसतो. यामुळे या परीक्षेत आपण मागे पडतो. तुम्ही नियमित अभ्यास करा. व्यायाम करा. खेळ खेळा. छंद जोपासा. उच्च ध्येय ठेवा. संगनकाचे ज्ञान मिळवा. आपला भारत देश महासत्ता बनवायचा असेल तर कोणत्याही क्षेत्रात गेले तरी टॉप टेन मध्ये राहण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले.

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व व्यक्तीमत्व विकास या विषयावर ढिकले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मंचावर प्राचार्य भानुदास भिसे, उपप्राचार्य सुनील आढाव, सचिन सातपुते, प्रा. रुपा खेडकर, गुप्तवार्ता विभागाचे राजु चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रांरभी जिजाऊ, स्व. आबासाहेब काकडे, निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेंचे पुजन करण्यात आले.

यावेळी ढिकले म्हणाले, माहिती तंत्रज्ञान, नासा, इस्रो यामध्ये भारतीय तंत्रज्ञ मोठ्या संख्येने आहेत. अनेक विद्यार्थी गरीबी परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत. तुम्हाला यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपुर्ण अभ्यासाची गरज आहे. गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. शिक्षणासाठी कर्ज, शिष्यवृत्ती तसेच निधी देणाऱ्या संस्था – व्यक्ती आहेत. गरिबीत राहणे हा आपला दोष समजा. या परिस्थितीतुन बाहेर पडण्याची धमक तुमच्यात पाहिजे. स्वप्न झोपेत पाहु नका. ती स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रथम झोपेतुन जागे व्हा. तेव्हाच ती स्वप्ने पुर्ण होतील. वाईट प्रवृतींशी संगत करु नका. टी.व्ही., मोबाईलचा उपयोग फक्त ज्ञान मिळवण्यासाठी करा.

प्रास्ताविक करताना उपप्राचार्य आढाव म्हणाले कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य बनल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. तरच जीवनात आनंद, समाधान, प्रगती शक्‍य आहे. प्रा. शिवाजी पोटभरे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. अशोक तमनर यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)