संपुर्ण नागालॅंड अशांत टापू जाहीर

नवी दिल्ली: संपुर्ण नागालॅंड राज्य अफस्पा कायद्या अंतर्गत पुढील सहा महिन्यांसाठी अशांत टापू म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा जवानांना या काळात कोठेही कारवाई करण्याचा आणि कोणालाही पुर्व परपवानगी न घेता अटक करण्याचा अधिकार मिळाला आहे.

या संबंधात माहिती देताना गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की त्या राज्यातील स्थिती अत्यंत धोकादायक आणि अशांत झाली असल्याने नागरीकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा जवानांना असे अधिकार देण्यात आले आहेत. जून 2019 पर्यंत त्या राज्यात सुरक्षा दलांना हे अधिकार कायम राहतील. नागालॅंड मध्ये अनेक ठिकाणी लुटालूट, हत्या, खंडणी असे प्रकार उघडकीला आल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागालॅंड मध्ये अनेक दशके अफस्पा म्हणजेच सशस्त्र सेना दलांना विशेषाधिकार देणारा कायदा लागू होता. पण ऑगस्ट 2015 मध्ये तेथील एनएससीएन संघटनेशी झालेल्या करारानंतर तेथील हा कायदा मागे घेण्यात आला होता. नागा बंडखोर आणि केंद्र सरकार यांच्यात तडजोडीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या आत्ता पर्यंत झाल्या आहेत पण अद्याप तेथील प्रश्‍नावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)