नडशी येथे आगीत दोन शेळ्या व रेडकू ठार

शेडसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

कोपर्डेहवेली – नडशी कॉलनी, ता. कराड येथे शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास वाल्मिक जाधव यांच्या जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीत दोन शेळ्या व रेडूक जळून खाक झाले तर म्हैस होरपळल्याची घटना घडली. या आगीत शेडसह संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, नडशी कॉलनी येथील वाल्मिक जाधव यांचे जनावरांचे शेडला अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांसह शेडमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले. या भीषण आगीत दोन शेळ्या व रेडूक ठार झाले. यामध्ये जाधव यांचे मोठे नुकसान झाले. लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठी सह्याद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आग लागल्याचे समजताच स्थानिक युवकांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी आसपासच्या घरातून पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीत होरपळलेल्या जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद देशमुख यांनी उपचार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)