पॅरिस – लाल मातीवरील बादशहा म्हणुन ओळखला जाणारा राफेल नदाल व ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचा सम्राट अशी ओळख असलेला रॉजर फेडरर या दोन बलाढ्य खेळाडुंमध्ये झालेल्या खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात राफेल नदालने बाजी मारली आहे. स्पेनच्या राफेस नदालने राॅजर फेडरर यांचा २ तास २७ मिनिट चाललेल्या सामन्यात 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला आहे.
Nadal beats Federer, enters French Open finals
Read @ANI Story | https://t.co/5IS2cCqb5W pic.twitter.com/sCfIgGUeOb
— ANI Digital (@ani_digital) June 7, 2019
नदाल याने आजच्या विजयासह बाराव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेत नदाल याने आतापर्यंत अकरा वेळा विजेतेपद मिळविले आहे.