आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी 38 हजारांचे अनुदान

संगमनेर – आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सुविधेसाठी तालुकास्तरावर वसतिगृह सुविधा मिळावी, यासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी विभागाने तालुकास्तरावर वसतिगृहासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास 38 हजार रुपये अनुदानास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

या मंजुरीचा अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर या कामाचा सतत पाठपुरावा करणारे आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांचा अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. बी. एल. कुलकर्णी, प्रा. जी. बी. काळे, प्रा. जे. के. सातपुते, नामदेव गायकवाड, मिलिंद इंगोले, नीलिमा चौधरी, प्रा. गणेश बाऱ्हाडे, नानासाहेब कोल्हे, नवनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढला आहे. या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहाची सुविधा आहे. हीच योजना तालुका स्तरावर व्हावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या शहरात शिक्षण घेता येऊ शकते. भोजन, निवास, शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणारा भत्ता आता अमृतवाहिनीच्या पाठपुराव्याने तालुकास्तरावर मिळणार आहे. यातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर प्रत्येकी 3800 हजार रुपये जमा होणार आहेत. तंत्रशिक्षण, पदविका व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेत पात्र ठरणार आहेत.

यावेळी प्रा. खरात म्हणाले, आदिवासी मुला-मुलींसाठी घुलेवाडी येथे सुसज्ज व अद्ययावत वसतिगृह निर्माण केले आहे. परंतु मुलांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी वाढल्याने अनेकांनाही सुविधा मिळत नव्हती. ती मिळावी, म्हणून आपण पाठपुरावा केला. त्याबाबत आमदार थोरात, आमदार डॉ. तांबे यांनी विधिमंडळात अनेक लक्षवेधी केल्या.

त्यानंतर या रकमेस मंजुरी मिळाली आहे. पाठपुराव्याबाबत नानासाहेब कोल्हे व गणेश बोऱ्हाडे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मल्हारी पानसरे, नानासाहेब शिंदे, प्रा. नवनाथ शिंदे, सुनील सांगळे, नामदेव कांदळकर, शेखर सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रास्ताविक प्रा. जी. बी. काळे यांनी केले, तर नामदेव कहांडळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)