माझ्या वेळेसचा भारतीय संघ आता पेक्षा मजबूत होता – स्टिव्ह वॉ 

नवी दिल्ली: काही दिवसांपुर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आताचा भारतीय संघ गेल्या काही वर्षातील सर्वात बलाढ्य भारतीय संघ आहे असे प्रतिपादन के होते. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ याने शास्त्री यांचे विधान खोडून काढताना एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्या वेळेसचा भारतीय संघा आताच्या संघापेक्षा मजबूत आणि वैविध्य असणारा संघ होता.

स्टिव्ह वॉ म्हणाला, शास्त्रीयांचे मत सध्याच्या संघावरील दडपन देखिल वाढवू शकते. कारण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर हरवणे हे काही सोपे काम नाही. आमच्याकडे उत्तम गोलंदाज आहेत, जे कसोटीच्या दोन्ही डावात विरोधी संघाला बाद करू शकतात. पहिल्या डावात खेळताना जर आमच्या फलंदाजांनी 350च्या आसपास धावसंख्या बनवली तर आम्हाला जिंकण्यापासून रोखणे अशक्‍य असेल. त्याचबरोबर एखादा खेळाडू नेहमीच जबरदस्त कामगिरी करून एखादी मालिका गाजवू शकतो. तशी क्षमता नक्कीच आमच्या खेळाडूंमध्ये आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही भारताविरुद्धची मालिका नक्की जिंकू. परंतु, ही मालिका खूप अटीतटीची होईल असेही त्याने या वेळी नमूद केले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची त्याने यावेळी प्रशंसा करत त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्याशी केली आणि पुढे म्हणाला, विराट हा खूप चांगला खेळाडू आहे. तो अशा मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा खेळ उंचावतो. सचिन आणि लारा हे देखील असेच करायचे. तो स्पर्धेत ऑस्ट्रेलियासमोर आव्हान उपस्थीत करू शकतो. सध्याचा भारतीय संघ हा समतोल आहे. त्यामुळे त्यांना या मालिकेत यशस्वी होण्याची अशा आहे. परंतु, ही मालिका खूप अटीतटीची होईल, असेही त्याने या वेळी सांगितले. ऑस्ट्रेलियाला 1999 चा एकदिवसीय विश्‍वचषक जिंकून देणारा कर्णधार स्टिव्ह वॉ याने 2003-04 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ती मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडला गेलेला भारतीय संघ हा मागील 15 वर्षातील सर्वांत मजबूत संघ आहे. या विधानावर भाष्य करताना स्टिव्ह वॉ ने आपले मत मांडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)