न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास : अजित पवार

मुंबई: सिंचन प्रकरण न्यायप्रविष्ट असून नागपूर खंडपीठात खटला सुरु आहे. त्यामुळे याबद्दल मी फार काही बोलणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. या प्रकरणातील चौकशीला मी कालही सहकार्य केले, आजही करतोय आणि उद्याही करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत हिवाळी अधिवेशनाचे आजचे कामकाज सुरु होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली बाजू मांडली.

याविषयी अजित पवार म्हणाले, मी सुरुवातीपासूनच सांगतोय की, कायदा-नियम हे सगळ्यांनाच सारखे असतात. भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर त्यांनी खुली चौकशी केली. ज्या-ज्या वेळी चौकशीसाठी बोलावले किंवा प्रश्नावली पाठवली, त्या-त्या वेळी ही उत्तरे दिली आहेत.

-Ads-

तसेच मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबद्दल मला एकच सांगायचेय की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी फार काही बोलणार नाही. माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे प्रकरणात कुठलीही बाधा येऊ नये याची काळजी मी घेत आहे. माझ्या वकिलांनीही तशीच सूचना केली आहे. सरकार आपले काम करत आहे असं दिसतंय, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)