म्युच्युअल फंड – सर्वसामान्यांसाठी शेअरबाजाराचे प्रवेशद्वार (भाग-१)

गुंतवणूक शास्त्रामध्ये पारंगत असणारा गुंतवणूकदार अभावानेच सापडतो. आपल्या रोजच्या नोकरी-व्यवसायातून वेळ काढून गुंतवणुकीच्या विविध साधनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी शिस्त, चिकाटी आणि त्याबरोबरच वेळेचे नियोजन लागते. हे सगळे जुळून येणे अवघड असल्याने अभ्यासू गुंतवणूकदार खूपच कमी असतात. परंतु प्रत्येकाला गुंतवणुकीतून चांगला परतावा हवा असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी तर त्यातील जोखिम आणि शेअर बाजाराचा फारशी माहिती नसल्याने गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजारातील फायद्याची फळे मिळू शकतात. एका अर्थानेगुंतवणुकदारांसाठी ‘म्युच्युअल फंड योजना’ या उत्तम पर्याय ठरतात.

जर प्रत्येक गुंतवणूकदार भविष्यातील उत्तम परतावा देणाऱ्या संधी शोधू शकत नसेल, (उदा. उत्तम परतावा देणारे गुंतवणूक पर्याय, भविष्यात भरघोस परतावा व उद्दिष्टे पुर्तता करणारे – शेअर, रोखे, जमीन, उच्च प्रतीचे सोनं इ.) अशा वेळी सर्व कायदेशीर बाबींच्या पूर्ततेनंतर आपल्या जोखिम घेण्याच्या नेमक्या ताकदीनुसार, कोणता पर्याय निवडावा याबाबत गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असतो.  कष्टाने कमावलेल्या पैशाचे प्रत्येक गुंतवणूकदार शक्य तितकी काळजी घेऊन गुंतवणूक नियोजन करत असतात. परंतु खुप वेळा गुंतवणूक पर्यायांची निवड करत असताना होणारा गोंधळ, अपूर्ण गुंतवणूक ज्ञान, प्राप्तीकर व इतर कायद्याची अपूर्ण माहिती, उद्दिष्टे लवकर पूर्ण करण्याच्या गडबडीत चुकीच्या पर्यायांची निवड….अशा अनेक अडचणी गुंतवणुकदाराच्या समोर उभ्या रहातात.

या सर्वांवर मात करण्यासाठी भारतात १९६४ पासून अस्तित्वात आलेल्या म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणुकदाराच्या जवळपास सर्व गुंतवणूक गरजा पूर्णकरतात.

तरूण गुंतवणुकदारांना अनेकदा शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यास सतत मोह होत असतो. कमी कालावधीत पटकन “पटींनी” पैसे कमावणाऱ्या शेअर्सच्या मागे लागून अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा घालवून बसतात. बाजारात मोफत मिळणाऱ्या कथित ” टिप्स ” मुळे असे गुंतवणुकदार अडचणीत सापडतात. जर आपला शेअर बाजाराचा योग्य अभ्यास नसेल व फारशी जोखिम न वाढवता परतावा वाढवायचा असेल तर “म्युच्युअल फंड” हे निश्चीतच योग्य पर्याय ठरतात.

म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेमध्ये असणारा पोर्टफोलिओ “सरासरीचा परतावा” ( Average Return ) या संकल्पनेवर आधारित असतो. पोर्टफोलिओमध्ये असणाऱ्या अनेक कंपन्याच्या बाजारभावाच्या  मुल्याच्या सरासरी नुसार परतावा मिळवता येतो. यामुळे एकत्रित जोखिम (Concentrated Risk) न घेता, सरासरीचा परतावा कमावता येतो.

उदा. जर पोर्टफोलिओमध्ये एकूण २५ कंपन्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचा परतावा त्यातील सर्वात चांगल्या अथवा सर्वात खराब शेअरच्या मुल्याच्या इतका न मिळता सरासरी इतका मिळतो.

बहुतांशी सर्व गुंतवणूकदारांना बाजारातील सर्वात्तम परतावा देणारी कंपनी कोणती हे शोधण्यासाठी आवश्यक ज्ञान व त्यासाठीचा वेळ ही उपल्बध नसतो, अशा वेळी हे काम म्युच्युअल फंडाचे ” फंड मॅनेजर ” उत्तमरीत्या करत असतात.

म्युच्युअल फंड – सर्वसामान्यांसाठी शेअरबाजाराचे प्रवेशद्वार (भाग-२)

गुंतवणूक हे एक शास्त्र आहे आणि या शास्त्राचा अभ्यास करताना अनेक गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं तितकेच महत्वाचे ठरते. गुंतवणुकीमध्ये एक महत्त्वाचा नियम पहावयास मिळतो तो म्हणजे ” चक्रवाढ व्याजाचा नियम “. याचा नेमका फायदा घेण्यासाठी गुंतवणूक मानसिकतेचा विचार करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारानुसार गुंतवणूकदारांची मानसिकता बदलते. शेअर्स, रोखे, जागा, सोनं इ. गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकदारांची मानसिकता बदलत असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)