म्युच्युअल फंड – सर्वसामान्यांसाठी शेअरबाजाराचे प्रवेशद्वार (भाग-२)

गुंतवणूक शास्त्रामध्ये पारंगत असणारा गुंतवणूकदार अभावानेच सापडतो. आपल्या रोजच्या नोकरी-व्यवसायातून वेळ काढून गुंतवणुकीच्या विविध साधनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी शिस्त, चिकाटी आणि त्याबरोबरच वेळेचे नियोजन लागते. हे सगळे जुळून येणे अवघड असल्याने अभ्यासू गुंतवणूकदार खूपच कमी असतात. परंतु प्रत्येकाला गुंतवणुकीतून चांगला परतावा हवा असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी तर त्यातील जोखिम आणि शेअर बाजाराचा फारशी माहिती नसल्याने गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजारातील फायद्याची फळे मिळू शकतात. एका अर्थानेगुंतवणुकदारांसाठी ‘म्युच्युअल फंड योजना’ या उत्तम पर्याय ठरतात.

म्युच्युअल फंड – सर्वसामान्यांसाठी शेअरबाजाराचे प्रवेशद्वार (भाग-१)

गुंतवणुकीतील नुकसानीकडे पहाण्याचा दृष्टीकोन 

बऱ्याच वेळा गुंतवणुकदार आपल्या गुंतवणुकीत जर नुकसान झाले तर तर ते मान्य करण्याच्या मानसिकतेत नसतो आणि गुंतवणूक सुरुच ठेवतो व नुकसान भरुन येण्याची वाट पहात बसतो.

गुंतवणुकीमध्ये झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष

एकदा गुंतवणूक केली की बऱ्याच वेळा गुंतवणुकदार सदर गुंतवणूक विसरून जातात. आपल्याला गुंतवणुकीमध्ये नफा झाला की नुकसान हेही तपासले जात नाही. पैशांची गरज निर्माण झाल्यावर काही वेळा लक्षात येते की नुकसान झाले आहे, अशावेळी नुकसान भरुन काढण्यासाठी गुंतवणुकीमध्ये थांबून रहातात.

भुतकाळातील मूल्यासाठी वाट पहाणे

भूतकाळात एकदा निर्माण झालेल्या मुल्याची वाट पाहण्याची चूक बऱ्याच वेळा गुंतवणुकदार करतात. उदाहरणार्थ : जर एखाद्या शेअरचा भूतकाळातील मूल्य रु.१०००.०० असेल, आणि आजचे मूल्य रु.४००.०० असेल, तर गुंतवणुकदाराची खरेदी रु.१००.०० असूनही तोमूल्य रु.१०००.०० होण्याच्या प्रतिक्षेत राहतो.

बाजाराच्या प्रभावात निर्णय पुढे ढकलणे

बाजारात गेल्या काही काळातील प्रभावात गुंतवणुकदार अडकून पडतात. २००३ ते २००७ या काळात शेअर बाजारात तेजी आली होती..या प्रभावात अनेक गुंतवणूकदार गुंतवणुकीमध्ये नफा झालेला असतानाही तेजीच्या प्रभावात अडकून पडले, गेल्या काही महिन्यांपासून बाजारात पडझड सुरू आहे, याही वेळी गुंतवणूकदार मंदीच्या विळख्यात अडकलेले आहेत. अशा वेळी अनेक चांगल्या गुंतवणूक संधी निसटून जातात.

वरील सर्व प्रकारच्या मानसिकतांचा विचार करता गुंतवणूक करताना ती जर म्युच्युअल फंडाच्या योजनेत केली असता योजनेचा फंड मॅनेजर या सर्वांवर मात करून ‘व्यावसायिक दृष्टिकोनातून’ गुंतवणूकीकडे पाहत असतोव आवश्यक निर्णय घेतो. असे केल्याने गुंतवणुकदाराचा मानसिक भावनांचा गोंधळ टाळता येतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)