मटणाच्या वाट्यावरून जोरदार राडा ; चाकूने केला वार 

लातूर- धुलिवंद सणानिमित्त गावात बकरा कापला असता मटणाच्या वाट्यावरून जोरदार राडा झाला. उदगीर तालुक्यातील बोरताळ तांडा येथे २१ मार्च रोजी धूलिवंदन निमित्त गावात बकरा कापला असता, मटणाच्या वाट्यावरून झालेल्या वादातून एकाला धारधार चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे.

धुलिवंद निमित्त गावात बकरा कापण्यात आला असता, त्यानंतर गावकऱ्यांना मटण वाटण्यात आले. यावेळी सर्वांना मटणाचे सामान वाटे लावण्यात आले होते. फिर्यादी हे दुपारी १ वाजता आपला वाटा घेण्यासाठी घटना स्थळी गेले होते. त्या ठिकाणी संजय बालाजी जाधव, पंकज मारोती राठोड हे होते. त्यांनी त्याला तू इथे का आलास म्हणून सुनीलला शिवीगाळ करून धक्काबुकी करण्यास सुरुवातर केली. त्यानंतर संजय आणि सुनील मध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची निर्माण झाली. नंतर संजय जाधवने सुनीलला मारहाण केली व धारधार चाकूने उजव्या पायाच्या घोटाजवळ भोकसले. पंकज याने लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सुनीलला जीवे  मारण्याची धमकी सुद्धा दिली.

त्यावेळी फिर्यादीचा भाऊ बाळू पवार, अंकूश राठोड आणि इतरांनी सुनीलला त्यांच्या तावडीतून सोडवले. याप्रकरणी सुनीलने भावांच्या मदतीने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर तिथून उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)