#Video : कालावाग्रस्तांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

पुणे – खडकवासला कालवा फुटून दांडेकर पूल वसाहतीमधील नुकसान झालेल्या कुटुंबाना तातडीची बाब म्हणून आवश्यक असलेली मदत अद्यापही मिळत नसल्याने या नागरिकांनी आता प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कालवाग्रस्तांनी आज पुणे येथे दूपारी दांडेकर पूलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत प्रंचड संताप दिसून येत होता. या अांदोलनात मोठ्या माणसांसह लहान मुलेही सहभागी झाले होते. यावेळी कालवाग्रस्तांच्या हातात प्रशासनाचा निषेध असे फलक ही होते. या रास्ता रोकोमुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

-Ads-

कालव्याचे पाणी घरात घुसल्याने सुमारे 98 घरे वाहून घरामधील साहित्याचे नुकसान झाले आहे. तर अनेकांचा सगळा संसार वाहून गेल्याने या नागरिकांना जवळच असलेल्या शाळेत आसरा घ्यावा लागला असून मदत मिळणार असल्याने काम सोडून या कुटुंबाना दिवसभर घराबाहेर थांबावे लागत आहे. सुरुवातीला काही दिवस महापालिका, स्वयंसेवी संस्था तसेच नगरसेवकाकडून नाश्ता, पाणी जेवण दिले जात होते मात्र आता ते सुद्धा बंद झाले आहे. तर घरात काही करायचे झाल्यास ना भांडी आहेत ना गॅस त्यामुळे नागरिकाची सहनशीलता संपली असून आता प्रशासनाला जागे करण्यासाठी  हे आंदोलन करण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
112 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
78 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)