गडकरींवर टीका करताना मुत्तेमवार यांची जीभ पुन्हा घसरली

नागपूर – केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना विलास मुत्तेमवार यांनी ‘भ्रष्टाचाराचा सांड’ असे म्हंटले आहे. नागपूर मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी असा शब्द उच्चारला आहे.

नितीन गडकरी यांच्यावर बोलताना मुत्तेमवार म्हणाले कि,” नागपूर मध्ये नितीन गडकरींचा मुकाबला आता कोणी करू शकत नाही, कारण गडकरी हे भ्रष्टाचाराचा सांड आहेत. त्यामुळे नागपूर मधील निवडणूक आता पैशाची झाली असून, नागपुरात खासदार, आमदार आता बदलायला पाहिजे.” पुढे बोलताना विलास मुत्तेमवार यांनी नागपूर मध्ये सत्ताबदल झालाच पाहिजे असे म्हंटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)