नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेते ‘अनुप खेर’ देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
Anupam Kher, to attend PM Modi's oath ceremony today: It feels good to be a part of a historic event. Development was the focus for this Lok Sabha elections. As citizens of the country, it is time for us to also make our contribution to the country. pic.twitter.com/TnDiZ0zSBO
— ANI (@ANI) May 30, 2019
दरम्यान, आज शपथविधी सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.