मुस्लीम आमदार आक्रमक; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मुंबई: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला. मराठा, धनगर आरक्षणानंतर आता मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मुस्लीम आमदार आक्रमक झाले. सभागृहातील सहा मुस्लीम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, धनगरांना पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले होते, त्याबाबत सरकारने काहीच केले नाही. या निषेधार्थ आवाज उठवत आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वारंवार सभागृहात राजदंड उचलला जाऊनही सभागृह सुरू ठेवले जाते हा सभागृहाचा अपमान असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. विधानभवनातील दोन्ही सभागृहे ही काही प्रथा, नियमांप्रमाणे चालतात, राजदंड एक सन्मानचिन्ह आहे. मराठा-मुस्लिम-धनगर समाजाच्या आऱक्षणाचा मुद्दा, दुष्काळाच्या मुद्द्यावर सलग दुसऱ्या दिवशीही सरकार टोलवाटोलवी करत आहे. या मुद्द्यांवर वारंवार राजदंड उचलला जाऊनही सभागृह सुरू ठेवले जाते. हा सभागृहाचा अपमान असल्याची भूमिका आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. यापूर्वी हे कधीच झाले नव्हते हा लोकशाहीचा अवमान असल्याचे आव्हाड म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)