“दया माया न दाखवता ठार मारा’ – कुमारस्वामी यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग

बेंगळूरु: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या एका व्हिडीओने आता नवीन वादंग निर्माण झाले आहे. “दया माया न दाखवता ठार मारा’ असे आदेश कुमारस्वामी पोलिसांना देत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मध्यप्रदेशात धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता गोळ्या घाला, असे ते म्हणताना दिसत आहे. मात्र ही आपली अत्यंत भावनिक प्रतिक्रिया होती. प्रत्यक्ष्यात आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टिकरण कुमारस्वामी यांनी नंतर दिले आहे.

कुमारस्वामी यांच्या या वक्‍तव्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जोरदार आगपाखड केली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्‍तव्य अत्यंत बेजबाबदार आणि मूर्खपणाचे आहे, अशी टीका भाजपने केली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कार्यकर्ते एच. प्रकाश यांची मध्यप्रदेशातील मंड्या जिल्ह्यात सोमवारी चार हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी प्रकाश यांची कार थांबवून त्यांच्यावर धारदार चाकूने वार केले होते. प्रकाश हे माजी जिल्हा पंचायत सदस्य होते. या हत्येमुळे मद्दुर आणि मंड्या जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वीही अशाप्रकारे तीन हत्या झाल्या होत्या. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देताना हे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)