पुणे – पालिका रुग्णालयात जन्मणाऱ्या बाळांना मिळणार बेबीकिट

पुणे – खासगी रुग्णालयांप्रमाणे महापालिका रुग्णालयातही आता हायटेक सेवा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात अर्भकांना आता “बेबीकिट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या किटसाठी तब्बल 41 लाख 39 हजार 856 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. एवढ्या रुपयांत प्रत्येक बाळासाठी “जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ कंपनीचे बेबी शाम्पू, बेबी ऑइल, बेबी सोप, बेबी पावडर, बेबी लोशन, ब्रश आदी साहित्याचा समावेश असणार आहे. आर. एस. एन्टरप्रायझेस या कंपनीला हा ठेका देणयत आला आहे. एका किटची किंमत वस्तू-सेवाकरासह 504 रुपये आहे. एकूण 8 हजार 214 बेबीकिट खरेदी करण्यात येणार आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)