नगर महापालिका रणसंग्राम: “ऑफलाईन’चाच इच्छुकांना दिलासा! 

ऑनलाईन अर्जप्रक्रिया अनिवार्य नाही : कायद्याच्या भाषेतील तक्रारीनंतर आयोगाची माघार 

नगर: ऑनलाईन अर्ज भरण्याचा कायदा नव्हता. राज्य निवडणूक आयोगाचा हा आदेश होता. हा आदेश म्हणजे उमेदवारांची अर्ज भरताना होणारी दमछाक आणि त्यातून होणारी मानसिक पिळवणूक! इच्छुक उमेदवारांनी त्याचा अभ्यास केला आणि कायद्याचा आधार घेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले. निवडणूक आयोगाला हे आव्हान पेलविले नाही आणि शेवटी ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य नसून, फक्त इच्छुकांनी ऑफलाईन अर्ज भरला तरी, चालेल असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

अहमदनगर व धुळे महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीचे इच्छुकांकडून अर्ज भरण्याची धावपळ सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. हे अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची 13 तारखेपासून धावपळ सुरू आहे. परंतु त्याला काही यश येईना. ऑनलाईन अर्ज भरताना संगणकप्रणालीत असंख्य अडचणी येत होत्या. उमेदवारांची दिवस-दिवस ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरायला जायचा. परंतु अर्ज भरला जात नव्हता. राज्य निवडणूक आयोगाचे सर्व्हर डाऊन व्हायचे. राजकीय पक्षांनी याबाबत तक्रारी सुरू केल्या. तरी देखील राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत काहीही सुधारणा होईना.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी आयोगाकडे तक्रार केली. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत निवडणूक आयोगाचा याबाबत कायदा आहे का, याचा अभ्यास सुरू केला. याबाबत कोणताही कायदा नसल्याचे समोर आले. ऍड. प्रसन्ना जोशी यांनी हा अभ्यास करत त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात कोणताही कायदा नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना त्यासाठी बंधन घालता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय न घेतल्यास न्यायालयात जाऊ, असा इशाराच दिला.

ऍड. जोशी यांच्या तक्रारारीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारीचाच ओघ सुरू झाला. अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी तक्रारी सुरू केला. राज्य निवडणूक आयोगावर याचा दबाव वाढला. परिणामी राज्य निवडणूक आयोगाने काहीसे नमते घेत, ऑनलाईन अर्ज भरणे हा कायदा असून, राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे, असे सांगितले. राज्य निवडणूक आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे इच्छुकांनी ऑफलाईनच अर्ज भरले, तरी चालतील, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयोगाकडून यासंदर्भातील तोंडी स्वरूपाचे आदेश आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)