नगर महापालिका रणसंग्राम: “जागरूक’च्या मेळाव्यास इच्छुक उमेदवारांची झुंबड 

मतदार जागृती अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन : पैसे न घेता मतदान करण्याचे आवाहन 

नगर: शहरांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून नागरिकांच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या जागरुक नागरिक मंचचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात झाला. आगरकर मळा येथे मेळावा झाला.

महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात जागरूक नागरिक मंचचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची कार्यक्रम स्थळी झुंबड उडाली होती. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या या स्नेहमेळाव्यात जागरूक नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून मतदार जागृती अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. हे मतदार जागृती अभियानाचे पत्रके या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांना तसेच इच्छुक उमेदवारांना ही देण्यात आले.

गांधी म्हणाले, “जागरूक नागरिक मंच दोन वर्षापासून नगरमध्ये जनजागृतीचे महत्वाचे काम करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात विश्‍वासार्हता वाढत आहे. वेळोवेळी केलेली आंदोलने व राबलेले सामाजिक उपक्रम हे काम कौतुकास्पद आहे.’ मतदार जागृती अभियानामुळे नक्कीच येत्या निवडणुकीत फरक दिसेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जागरूक नागरिक मंचच्या दोन वर्षाच्या कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांनी प्रास्ताविकात घेतला.
जागरुक नागरिक मंचचे उपाध्यक्ष सुनील पंडित, सचिव कैलास दळवी, कार्यकारणी सदस्य बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, राजेश टकले, जयकुमार मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, संजय वल्लाकट्टी, नंदकुमार शिंदे , अमन शेख, पुरुषोत्तम गारडे, अतुल डावरे, धनेश बगावत, प्रमोद देशपांडे, राजू पोद्दार, योगेश गणगले, बी. यू. कुलकर्णी, शारदा होशिंग, सुरेखा सांगळे, निर्मला चौधरी, आदींसह सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा, पैलवान अंजली वल्लाकट्टी, हिंद सेवा मंडळाचे सचिव सुनील रामदासी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, सरचिटणीस किशोर बोरा, अशोक सरनाईक, सुनील काळे आदींसह आजी-माजी नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

जागरूक मंचाविरोधात भष्ट्राचाराविरोधातच लढा… 

शहरातील शाळांच्या वेळेत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणे, सुमारे दहा हजार नागरिक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत एक दिवसात एतेहासिक भुईकोट किल्ल्‌याची स्वच्छता, दिल्लीदरवाजा येथे पहिला सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, महानगर पालिकेतील पथदिवे घोटाळा, बोगस कामांचे ठराव व इतर भष्ट्राचाराविरोधात निर्भीडपणे काम केले. महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर शहरात होत नसलेल्या विकास कामांच्या निषेधार्थ महानगरपालिकेवर प्रशासन नेमण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून नगर विकास मंत्रालय व मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यास भाग पाडले.महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार जागृती अभियानाद्वारे पत्रके वाटून शंभर टक्के मतदान घडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार जागरूक मंचाने यावेळी केला आहे. उमेदवारांकडून पैसे न घेता मतदान करा, असे आवाहन यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)