महापालिका रणसंग्राम २०१८: काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून तिढा

नगर: नगर महापालिका निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. एकीकडे उमदेवार तिकीट मिळवण्याच्या धावपळीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जागा वाटपाची प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या उद्देशाने आणि आघाडीचा निर्णय निश्‍चित करण्यासाठी येत्या 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आयोजित केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नगरचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले आहे. महानगरपालिका निवडणूकीसाठी येत्या 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, निरीक्षक उमाळकर अन्य नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आघाडीवरून पहिल्यांदाच दोन्ही पक्ष आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. आघाडीचा निर्णय प्रदेशपातळीवर जेव्हा होईल, तेव्हा होईल, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेच्या 17 प्रभागांमधील इच्छुक 68 उमेदवारांची ब्लू प्रिंट तयार केली आहे. इच्छुकांचा ही ब्लू प्रिंट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडेही पोहचविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)