अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची पाळी शिवसेनेवर का आली – मुंडे

मुंबई:  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभुमीवर धनंजय मुंडे यांनी ही टीका केली आहे. अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची पाळी शिवसेनेवर का आली ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, अफजलखानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत असे यांनीच भाजपला हिणवले होते ना? मग आता अशा कोणत्या ‘ईडी’पीडा आल्या आहेत की अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची पाळी यांच्यावर आली आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)