‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

‘मुंबई- पुणे- मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्माते संजय छाब्रिया आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग ७ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भागाला जगभरातून प्रतिसाद मिळाला होता. ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. तसेच पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.

”मुंबई- पुणे- मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेण्ड झाला असून प्रेमकथेचा अनोखा धडा त्यातून गिरवला गेला आहे. गौतम आणि गौरीच्या आयुष्यात आता पुढे काय घडणार याचं कुतूहल प्रेक्षकांना आहे. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल मी फार काही सांगणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे,’ असं सतीश राजवाडे म्हणाले. ”मुंबई- पुणे- मुंबई 3′ सोशल मिडीयावर चांगलाच ट्रेंड होत आहे. #mpm3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)