मुंबई पोलिसांची होळीच्या दिवशी धडक कारवाई

मुंबई – देशभरामध्ये आज होळीच्या उत्सवामुळे धुमधाम असून देशभरातील लोक मोठ्या उत्साहाने या रंगांच्या उत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. दरम्यान होळीच्या या पवित्र सणादिवशी मुंबई मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून आज मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून संपूर्ण शहरात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहतूक पोलिसांनी आज नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्ब्ल 9191 जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

यामध्ये दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल  461, रॅश वाहन चालविल्याबद्दल 162, वेगवान गाडी चालवणाऱ्या 345 वाहकांवर, तसेच ट्रिपल सीट असणाऱ्या 680 आणि  4595 हेलमेटविना वाहन चालविल्याबद्दल व  2948 जणांवर इतर किरकोळ गुन्हेगारीसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1108773519905751041

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)