मुंबई पोलिसांनी वाचवला ब्रिटीश नागरिकाचा जीव

मुंबई- 27 जून रोजी पवई पोलिसांना कंट्रोल रुमकडून एक ब्रिटीश नागरिक हिरानंदानी भागातील टोराने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला समजावून सांगत आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवल्याने मुंबई पोलिसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

संबंधित नागरिक ऍव्हलॉन इमारतीच्या 33 व्या मजल्यावर राहतो. या व्यक्तीचे नाव सॅम कोलार्ड असून तो 61 वर्षीय आहे. त्यांना पक्षाघाताचा झटका येऊन गेला आहे. ते एका अमेरिकन कंपनीत काम करतात. अंधेरीमध्ये त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सॅम यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या पत्नीला फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान दाखवत तात्काळ बीकेसमधील ब्रिटीश उच्चायुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी सॅमयांना या घटनेनंतर रुग्नालयात दखल केले.

यानंतर ब्रिटीश उच्च आयुक्तालयाच्या कॉन्सुलरने रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यांचा मुलगाही युकेहून आला आहे. वेळीच प्रसंगावधान दाखवत सॅम यांचा जीव वाचवल्याबद्दल पवई पोलिसांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)