विराट कोहलीच्या ‘अोवर-स्पीड’ वर मुंबई पोलीस खुश, नाही आकारणार दंड

नवी दिल्ली – विराट कोहली हा त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगात अोळखला जातो. भारतासह साऱ्या जगात विराटचे करोडो चाहते आहेत. कालच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८१ धावांचा टप्पा पार करताच तो सर्वात जलद १०, ००० धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ही कामगिरी  केली. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचे कौतुक विरोधी संघाच्या खेळाडूपासून ते मुंबई पोलीस करत आहेत.

सचिन तेंडुलकरने सर्वात जलद १०,००० धावा करण्यासाठी २५९ एवढे डाव खेळले होते तर विराटने त्याच्यापेक्षा उजवी कामगिरी करात २०५ डावात फलंदाजी करताना १० हजार धावा पूर्ण केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई पोलीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून विराट कोहलीचे कौतूक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई पोलीसांनी ट्विवट करत म्हटलं आहे की, ‘या अोवर स्पीड साठी आम्ही तुझ्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारणार नाही, फक्त तुला त्यासाठी शाबासकी आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा मिळतील. तुझ्या या खास कामगिरीसाठी खूप-खूप शुभेच्छा’.

मुंबई पोलीसांच्या या मजेदार ट्विटला सोशल मीडियावर लोकांकडून पसंती मिळत आहे. मुंबई पोलीसाच्या सोशल मिडियावर नेहमीच अशा मजेदार पोस्ट पहायला मिळत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)