इंधनदरवाढीचे सत्र पुन्हा सुरू; दिलासा फार काळ टिकला नाही

प्रमुख शहरातील आजचे इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (87.73), डिझेल (77.68)

पुणे : पेट्रोल (87.60), डिझेल (76.35)

चेन्नई : पेट्रोल (85.50), डिझेल (78.35)

कोलकत्ता : पेट्रोल (84.09), डिझेल (75.96)

दिल्ली : पेट्रोल (82.26), डिझेल (74.11)

मुंबई –  केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतरही सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

आज मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी तर डिझेलच्या दरात 31 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा प्रति लीटर दर 87.73 रूपये तर डिझेलचा दर 77.68 रूपये इतका झाला आहे.

-Ads-

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोल प्रति लीटर 82.26 रूपये झाले आहे. तर डिझेलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाल्याने डिझेल 74.11 रूपये प्रति लीटर झाले आहे.पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोल दर 87.60 रूपये तर डिझेलचा दर 76.35 रूपये इतका आहे.

दर कपात केल्यानंतर पुन्हा इंधनदरवाढ

वाढत्या इंधनदरवाढीपासून सामान्य जनतेला दिलासा मिळावा, याकरिता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी अडीच रूपयांची कपात केली होती. तर महाराष्ट्रात राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरता अडीच रूपये आणि डिझेलच्या दरात 1.56 रूपयांची कपात केली होती. म्हणजेच राज्यात पेट्रोल हे 5 रूपयांनी तर डिझेल 4.06 रूपयांनी स्वस्त झाले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोज होत असलेल्या दरवाढीमुळे ही 5 रूपये आणि 4.06 रूपयांची दरकपात फार काळ टिकेल अस दिसतं नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)