आणखी काही महत्वाच्या घोषणा
म्हाडाच्या घराच्या किमती कमी केल्यानंतर ही घरं विकली गेली नाही तर ती पोलिसांना देता येतील का याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 17 हजार बोनस, 5 हजार रूपये वैद्यकीय भत्ता, तसेच दरवर्षी वैद्यकीय भत्यात 5 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. तसेच दरवर्षी 3 ड्रेस आणि 1500 रूपये शिलाई फी दिली जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.
मुंबई – मागील वर्षी म्हाडाच्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याने म्हाडाच्या लाॅटरीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी बांधून तयार असलेली घरे विकली गेली नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर म्हाडाने आपल्या घरांच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
राज्यात मुंबई विभागासाठी यंदा 1904 घरांसाठी लाॅटरी निघणार आहे. पुढील दहा दिवसांत म्हाडाच्या लाॅटरी प्रक्रियेच्या सर्व तारखा जाहिर होणार आहेत. त्यामुळे आपल स्वतच घर घेऊ इच्छिणाऱ्यासाठी ही एक खुशखबरच आहे.
राज्यात मुंबईसह नाशिकमध्ये 1150, अौंरगाबादमध्ये 918 आणि नागपूर शहरात 373 घरांची म्हाडाची लाॅटरी निघणार आहे. या घरांच्या किंमतीही 20 ते 47 टक्क्यांनी कमी होणार आहे.म्हाडाच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांना निश्चितच फायदा होणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा