-शेवटच्या चेंडूवर एका धावेने रोमहर्षक विजय
-शेन वाॅटसन याने आणली होती सामन्यात रंगत
हैदराबाद – शेवटच्या चेंडू पर्यंत अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईन इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जसंघाचा एका धावेने पराभव करत आयपीएल करंडकावर पुन्हा आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 149 धावांची मजल मारत चेन्नईसमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 148 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना केवळ एका धावाने पराभुत व्हावे लागले.
#IPL2019 : चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची 149 पर्यंत मजल
#VIVOIPL 2019 Champions 🏆 – @mipaltan 🔥 pic.twitter.com/XPl5dzh2H6
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या चेन्नईने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ ड्यु प्लेसिसने पहिल्या षटकापासून मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव वाढवत फटकेबाजी करायला सुरूवात केली. त्यामुळे मुंबईने पहिल्या तीन षटकांत तीन वेगवेगळे गोलंदाज आजमावून पाहिल्या नंतर चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कृणाल पांड्याने ड्यु प्लेसिसला बाद करत मुंबईला पहिला बळी मिळवून दिला. यावेळी ड्यु प्लेसिसने 26 धावांची वेगवान खेळी केली.
प्लेसिस बाद झाल्यानंतर आलेल्या रैनाला सोबत घेऊन वॉटसनने आपली फटकेबाजी कायम ठेवल्याने चेन्नईने केवळ 5.5 षटकांतच आपले अर्धशतक फलकावर लगावले होते. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव वाढला होता. यावेळी रैना सावध तर वॉटसन वेगाने खेळी करत चेन्नईची धावगती कायम ठेवण्यात प्रयत्नशील असताना रैना 8 तर त्यानंतर आलेला अंबाती रायडू केवळ 1 धाव करुन परतल्याने चेन्नईचा संघ अडचणीत सापडला असतानाच महेंद्रसिंग धोनी देखील 2 धावा करुन धाव बाद झाला. त्यामुळे 1 बाद 70 वरुन चेन्नईची अवस्था 4 बाद 82 अशी झाली.
FIFTY!
Back to back half-centuries for @ShaneRWatson33 👏👏 pic.twitter.com/om78JeoIXH
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
यानंतर आलेल्या ब्राव्होला सोबत घेत वॉटसनने फटकेबाजी करत चेन्नईला शतकी मजल ओलांडून देत आपले अर्धशतकही झळकावले.तर, ब्राव्हो केवळ चेंडू मागे धाव या गतीने खेळत असल्याने चेन्नईच्या संघावर दबाव वाढला. दबावात येत मोठा फटका खेळण्याच्या नादात ब्राव्हो बाद झाल्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाला साथीत घेत वॉटसनने आपली फटकेबाजी कायम राखत लसिथ मालिंगा आणि कृणाल पांड्याच्या षटकांत मोठे फटके खेळत संघला विजयासमीप आणुन ठेवले.
Final. 19.6: WICKET! S Thakur (2) is out, lbw Lasith Malinga, 148/7 https://t.co/VN7SfrAUfT #MIvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
मात्र, विजयासाठी 4 धावा बाकी असतान वॉटसन बाद झाल्यानंतर अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी 2 आणि सामना अनिर्णित राखण्यासाठी 1 धावेची गरज असताना मालिंगाने शार्दुल ठाकुरला पायचीत करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.