अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मार्ग अखेर मोकळा

मुंबई – देवेंद्र फडवणीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवस्मारकाला मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या कामास अंतरीम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी प्रवेश शुल्क आकारण्याच्या विचारात असल्याची माहिती राज्य सरकारनं गुरूवारी न्यायालयात दिली आहे, जेणेकरून 3600 कोटींच्या या प्रकल्पाचा काहीतरी खर्च वसूल होईल.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवकालीन गडांची दुरावस्था, सरकारवर असलेला कर्जाचा डोंगर या पार्श्‍वभूमीवर 3600 कोटी रूपये खर्च करून अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारका विरोधात चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या प्राध्यापक मोहन भिंडे यांनी जनहित यचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊनही सहा महिन्यांपासून प्रतिज्ञापत्र सादर न करणाऱ्या केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने गुरूवारी फैलावर घेतले. अशा प्रकारचे गंभीर प्रकरण सुनावणीसाठी असताना केंद्र सरकार त्यावर उत्तर दाखल करण्याबाबत कमालीचे उदासीन असल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)