#IPL2019 : मुंबईने दिला बंगळुरूला पराभवाचा दणका

File photo

बंगळुरू  -फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक आणि किफायतशीर गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजरचा 6 धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर बंगळुरूसाठी एबी डीव्हिलियर्सने 41 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. कोहलीने 46 धावा केल्या. रोहित शर्माच्या आक्रमक खेळीनंतर अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्याने फटकाविलेल्या झटपट 32 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर बंगळुरूसमोर विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 20 धावा देत 3 बळी घेतले.

विजयासाठी 188 धावांचा पाठलाग करताना बंगळुरू संघाची सुरुवात चांगली झाली होती. पावर प्लेमध्ये त्यांनी 1 बाद 61 धावा बनविल्या. पार्थीव पटेल बाद झाल्यानंतर विराट आणि डिव्हीलियर्सची जोडी जमली विराट 46 धावा करून बाद झाला. त्यानंतर डिव्हीलियर्सने एक बाजू सांभाळत बंगळुरूला विजयाच्या जवळ नेले; परंतु विजय मिळवून देण्यात तो कमी पडला. तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. सलामीवीरांनी पॉवर प्ले मध्येच संघाचे अर्धशतक फलकावर लगावले.

डी कॉक बाद झाल्यावर सूर्यकुमार यादाव फलंदाजीस आला. रोहित शर्मा एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत मुंबईची धावगती वाढवण्यास प्रयत्नशील होता. मुंबईने 10 षटकांत एक गडी बाद 82 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि युवराज बाद झाल्यावर मुंबईची मधली फळी कोलमडली. त्यामुळे त्यांना 187 धावांपर्यंत मजल मारता आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)