मुंबई सीएसएमटी पूल दुर्घटना – नीरज देसाईला 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मुबंई – न्यायालयाने सीएसएमटी पूल दुर्घटनेतील आरोपी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नीरज देसाई हे देसाई डीडी देसाई कंपनीचे पार्टनर आहेत. कोसळलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट त्यांनीच केले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर देसाई यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.

दरम्यान, सीएसएमटीच्या रेल्वे स्थानकाजवळचा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी नीरजकुमार देसाई यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. 14 मार्च रोजी रात्री पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जण ठार तर 34 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याप्रकरणी देसाई यांना पोलिसांनी अटक केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)