मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतून दोघांना अटक केली आहे. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. मात्र, या दोघांचा या हत्याकांडात काय सहभाग आहे हे अद्याप समजू शकलेला नाही. सीबीआयचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत.
Mumbai: CBI team investigating Narendra Dabholkar murder case has arrested two more people, identified as Adv Sanjeev Punakekar and Vikram Bhave. Both have been arrested from Mumbai.
— ANI (@ANI) May 25, 2019
दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुनाळेकर आणि भावे यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. संजीव पुनाळेकर हा मुंबई हायकोर्टात वकील आहे. तसेच या हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत.