बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मल्टिप्लेक्‍समध्ये मुभा

पुणे – मल्टिप्लेक्‍समध्ये चढ्या भावाने खाद्यपदार्थ विक्री केली जात होती. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात येत होती. याविषयी नागरिकांमध्ये असलेला असंतोष आणि संघटनांकडून होत असलेल्या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील किंवा घरगुती खाद्यपदार्थ घेवून जाण्यास अडवणूक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, कॅंन्टीनमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ छापील किंमतीतच विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करत पुण्यातील “आर डेक्कन’ आणि “कोथरुड सिटी प्राईड’मधील खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आले आहेत. तसेच, या मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या किंमती काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. या चित्रपटगृहात 200 रुपयांना मिळणारे पॉपकॉर्न आता 100 रुपयात, 80 रुपयात मिळणारे समोसे 60 रुपयात, 80 रुपयांना मिळणारी कॉफी 60 रुपयात मिळणार आहे. तसेच घरगुती खाण्याचा डबा, पाण्याची बाटली, बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सरकारी निर्णयाची आमच्याकडून अंमलबजावणी होत आहे. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास कोणताही विरोध केला जात नाही. तसेच आमच्याकडील खाद्यपदार्थांचे दरही कमी केले आहेत.

– सागर हरिशचंद्र, मॅनेजर, आर डेक्कन


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)