मुळशीतील कन्यांची अलिबागपर्यंत सायकल वारी

150 पेक्षा अधिक किमीचा प्रवास

हिंजवडी- मुळशीतील चार कन्यांनी खुबवली ते अलिबाग असे 150 किमी पेक्षा अधिक अंतर सायकलीद्वारे अवघ्या चार दिवसांत पूर्ण केले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या या विद्यार्थिनी आहेत. स्त्री सक्षमीकरण संकल्पने अंतर्गत महिंद्रा कॉलेजने क्रिया ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला.

या ग्रुपचे सदस्यही या सायकल वारीत सहभागी झाले होते. पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कोमल गणेश सुपेकर, आरती अशोक सणस, मोनाली खैरे सर्व 11 वितील विद्यार्थिनी आणि पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनी धनश्री अशोक सणस या विद्यार्थिनीने ही सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या विद्यार्थिनींनी युवा परिवर्तन या संस्थेला भेट दिली. अलिबागचा समुद्र किनाराही या मुलींनी सामाजिक कर्तव्य म्हणून स्वच्छ केला. महिंद्रा कॉलेजच्या क्रिया ग्रुपमधील पीटर सर, इलाय मॅडम, दीपाली कानगुकर, श्रुती बेलीटकर व हिरामण सातपुते यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. मुलींच्या आणि सदस्यांच्या खाण्या पिण्याची व राहण्याची सोय महिंद्रा महाविद्यालयातर्फे करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)