‘मुल्क’ आज प्रदर्शित, प्रतीक बब्बरच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक

अनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर काही विक्रमी सुरुवात केली नसली तरी अनेकांनी या चित्रपटाला उत्तम म्हटले आहे. ऋषी कपुर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा आहे.

यामध्ये प्रतीक बब्बर याने दहशतवादी साकारला आहे. तर ऋषी कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका केली आहे. दहशतवादी कारवाईमध्ये मुलाचा हात असल्याने त्यांच्या पूर्ण कुटुंबावर खटला चालू होतो. असा हा एकंदरीत या चित्रपटाचा गाभा आहे. यामध्ये तापसी पन्नू वकिलाच्या भूमिकेत आहे.
प्रतीकच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, मी या चित्रपटासाठी खूप अभ्यास केला. २००८ मधील मुंबई हल्ल्यात आरोपी असलेल्या डेव्हिड हेडली यांच्यावरील अनेक व्हिडिओ आणि त्यावरील पुस्तक ‘अ माईंडसेट ऑफ टेररिस्ट: द  स्ट्रेंज केस ऑफ डेव्हिड हेडली’ वाचले. त्याचबरोबर दहशतवादावर आधारित काही सिनेमे आणि ब्रिटीश नाटक ‘द स्टेट’ याचा देखील मी अभ्यास केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)