मुलायम सिंह यादव यांनी याप्रकरणी भीष्म पितामहांप्रमाणे शांत राहू नये – सुषमा स्वराज

नवी दिल्ली – रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभेचे उमेदवार आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याबद्दल आझम खान यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता भाजपच्या नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या जयाप्रदा यांच्या मदतीला धावल्या असून त्यांनी आझम खान यांच्यावर टीका केली आहे.

सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत या घटनेची तुलना महाभारतातील द्रौपदीशी केली आहे. मुलायम सिंह यांना समाजवादी पक्षाचे भीष्म पितामह असे संबोधून, सुषमा स्वराज यांनी मुलायम सिंह यादव यांनी याप्रकरणी भीष्म पितामहांप्रमाणे शांत राहून चूक करू नये असे म्हंटले आहे. तसेच या ट्विट मध्ये सुषमा स्वराज यांनी अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिम्पल यादव, जया बच्चन यांना देखील टॅग केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रामपूर लोकसभा मतदारसंघात जयाप्रदा विरुद्ध आझम खान यांच्यात सामना होत आहे. आझम खान यांच्या या वक्तव्यमुळे उत्तर प्रदेशसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आझम खान यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)