बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मुलायम सिंह अडचणीत

File photo

नवी दिल्ली: बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. मुलायम सिंह आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्या विरोधात या प्रकरणी सुरु असलेल्या तपासाची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला केली आहे. या संदर्भातील अहवाल दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. कॉंग्रेस नेते विश्‍वनाथ चतुर्वेदी यांनी या तपास अहवालाची मागणी केली आहे.

मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्याविरोधात सकृतदर्शनी प्रकरण दाखल झाल्याचे सीबीआयने 2007 साली म्हटले होते. सीबीआय चौकशीच्या आदेशांचा फेरविचार करण्यात यावा ही मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली फेटाळली होती. मात्र त्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत झाला याची चौकशी न्यायालयाने केली आहे. सीबीआयला दिलेली नोटीस आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर तात्पुरती स्थगित ठेवावी, अशी विनंती मुलायम सिंहांच्या वकिलाकडून न्यायालयाला करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. दीपक गुप्ता यांनी ही विनंती फेटाळून लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)