मुईनुल हक पाकचे भारतातील नवीन उच्चायुक्त

इस्लामाबाद – पाकिस्तानने आपले भारतातील नवीन उच्चायुक्त म्हणून मुईनुल हक यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान इम्रान खान यांनी काल मान्यता दिली. त्यांनी यावेळी एकूण 24 विदेशी प्रतिनिधींची नियुक्ती केली. हक हे सध्या पाकिस्तानचे फ्रांसचे राजदूत म्हणून काम करीत आहेत. त्यांनी या आधी पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्या प्रोटोकॉल विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. पाकिस्तानचे भारतातील विद्यमान उच्चायुक्त सोहेल मेहमुद यांची पाकिस्तानचे नवे विदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने हे पद रिक्त होते.

विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्या शिफारशी नंतर हक यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. कुरेशी यांनी या संबंधात म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ही एक महत्वाची बाब असल्याने सर्व संबंधीतांशी चर्चा करून मी हक यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. ते दोन्ही देशांच्या संबंधात उत्तम काम करतील असा विश्‍वास कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)