पुरूषांच्या गटात मोहम्मद अनासने पटकाविले रौप्यपदक

जकार्ता – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत आज रविवारी सकाळी घोडेस्वारीमध्ये भारताने दोन रौप्यपदक पटकाविले. त्यानंतर अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत हिमा दास हिने रौप्यपदक पटकाविल्यानंतर आता पुरूषांच्या ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत देखील भारताला रौप्यपदक मिळाले आहे.

अॅथलेटिक्समध्ये पुरूषांच्या ४०० मी धावण्याच्या शर्यतीत मोहम्मद अनास याने रौप्यपदक पटकाविले आहे. अतिंम फेरीत मोहम्मद अनास याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीचे अंतर ४५.६९ सेंकद वेळ नोंदवत पूर्ण करत दुसरे स्थान मिळविले. मोहम्मद अनास याने नववे रौप्यपदक पटकाविले आहे.

याआधी अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मी धावण्याच्या शर्यतीत हिमा दास हिने भारतासाठी आठवे रौप्यपदक पटकाविले आहे. हिमा हिने ४०० मीटर धावण्याचे अंतर ५०.७९ सेंकद वेळ नोंदवत पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)