#Photo Gallery : 6 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती भवनतील ‘मुघल गार्डन’ सर्वसामान्यांसाठी खुले

नवी दिल्ली – राष्ट्रपती भवन परिसरातील मुघल गार्डन ठरावीक कालावधीसाठी दरवर्षी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हणजेच 6 फेब्रुवारी (बुधवारी) पासून हे गार्डन सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती भवन परिसरातील मुघल गार्डनमध्ये ट्युलिप, गुलाबाची वेगवेगळ्या जातीची रंगीबेरंगी आकर्षक फुले फुलली असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ट्युुलिपची दहा हजार व गुलाबाची १२० जातींची फुले याठिकाणी आहेत. मुघल गार्डनचे वैशिष्ट्य म्हणजे येथील 95 टक्के फुले ही भारतीय आहेत. याशिवाय येथे हाॅलैं, जापान आणि जर्मनी येथील फुले सुध्दा आहेत.

मुघल गार्डनमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन बुकींग करणे गरजेचे आहे. यासाठी rashtrapatisachivalaya.gov.in या वेबसाइटवर जाऊन आनॅलाइन बुकींग करता येईल. हे गार्डन 6 फेब्रुवारी ते 10 मार्च 2019 पर्यंत सकाळी 9 ते 4 दरम्यान खुले राहिल.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)