एमटीएनल अग्नितांडव; आगीतून सर्व 100 जणांची सुखरुप सुटका

मुंबई – मुंबईतल्या वांद्रे परिसरात असलेल्या एमटीएनलच्या इमारतीला मोठी आग लागली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. रूग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या 31 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, 100 जणांना आगीच्या कचाट्यातून वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्याप्रमाणे, एसीचे शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. मात्र, अद्याप या मागचे निश्‍चित कारण सांगता येत नाही. तर, या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत आहेत. वांद्रे पश्‍चिमच्या एस.व्ही.रोडवर एमटीएनलची इमारत असून ही इमारत नऊ मजल्यांची असून याच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)