एमटीडीसीचे उन्हाळी सुट्ट्यांचे बुकिंग फुल्ल

पुणे – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांसाठी सुरू केलेल्या बुकिंगला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरातच जवळपास 90 टक्‍के पर्यटकांनी त्यांचे बुकिंग केले आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्‍वर, पाचगणी आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकाणांचे शंभर टक्‍के बुकिंग झाले आहे. तर यंदाही कोकण पर्यटनालाही बहुतांशी पर्यटकांनी प्रतिसाद दिला आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना खासगी हॉटेल चालक आणि व्यावसायिकांच्या तुलनेत सवलतीच्या दरात या सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे महामंडळाचे बुकिंग फुल्ल होत आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार राज्यभरात खासगी आणि स्थानिक नागरिकांना न्याहारी आणि निवास केंद्राचे ठेके दिले आहेत. त्यांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी महामंडळ स्वत: लक्ष देत असून त्यांचा न्याहारी, निवास आणि जेवणाचा दर्जा तपासून घेतला जात आहे. अशा प्रकारे राज्यभरात पाच हजार ठेके देण्यात आले आहेत. त्याचाही महामंडळ आणि पर्यटकांना लाभ होत आहे, अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा जानेवारी महिन्यातच उन्हाळी सुट्ट्यांचे बुकिंग सुरू करण्यात आले होते. या बुकिंगला पर्यटकांनी अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद दिला आहे, अशी माहितीही हरणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)