महाराष्ट्राच्या मधुरीमा, दिया, श्रावणी यांचा मानांकीत खेळाडूंना धक्का

एमएसएलटीए योनेक्‍स राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा

पाचगणी – मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मधुरीमा सावंत, दिया चौधरी, श्रावणी खवळे यांनी मानांकीत खेळाडूंना पराभवाचा धक्का देत येथे होत असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपुर्व फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत मानस धामणेने गुजरातच्या आकराव्या मानांकीत आर्यन शहाचा 6-1, 6-0 असा तर अर्णव ओरूगंती याने प्रज्वल तिवारीचा 6-4, 3-6, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.तमिळनाडूच्या तिस-या मानांकीत प्रणव रेथिन याने महाराष्ट्राच्या जोशुवा जॉन इपेन याचा 6-4, 7-5 तर कर्नाटकच्या आठव्या मानांकीत स्कंद रावने महाराष्ट्राच्या अझिम शेखचा 6-0, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात उप-उपांत्यपुर्व फेरीत महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत मधुरीमा सावंतने तेलंगणाच्या अव्वल मनांकीत चांदणी श्रीनिवासनचा 6-2, 2-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत दिया चौधरीनेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दिल्लीच्या चौथ्या मानांकीत रिया सचदेवने 6-4, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत श्रावणी खवळेने तेलंगणाच्या पाचव्या मानांकीत सौम्या रोंडेचा 6-3, 7-5 असा पराभव केला तर कर्नाटकच्या बाराव्या मानांकीत चार्मी गोपिनाथने आंध्र प्रदेशच्या आठव्या मानांकीत रिधि पोकाचा 7-5, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकीत रुमा गाईकैवारीने तेलंगणाच्या निराली पदानीया हीचा 6-2, 6-0 तर तिस-या मानांकीत परी चव्हाणने श्रीनिधी अमीरेड्डीचा 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत खुशी शर्माने महाराष्ट्राच्याच अलिशा देवगावकर हीचा 6-2, 6-2 तर सातव्या मानांकीत सोनल पाटीलने स्वरा काटकरचा 6-2, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.

सविस्तर निकाल –

उपांत्यपुर्व फेरी – 14 वर्षाखालील मुले – मानस धामणे(1)(महाराष्ट्र) वि.वि. आर्यन शहा(11)(गुजरात) 6-1, 6-0, प्रणव रेथिन(3)(तमिळनाडू) वि.वि. जोशुवा जॉन इपेन(महाराष्ट्र) 6-4, 7-5, स्कंद राव(8)(कर्नाटक) वि.वि अझिम शेख(15) (महाराष्ट्र) 6-0, 6-1, अर्णव ओरूगंती(महाराष्ट्र) वि.वि प्रज्वल तिवारी(14)(महाराष्ट्र) 6-4, 3-6, 7-5.

उप-उपांत्यपुर्व फेरी – 14 वर्षाखालील मुली – मधुरीमा सावंत (महाराष्ट्र) वि.वि चांदणी श्रीनिवासन(1)(तेलंगणा) 6-2, 2-6, 6-3, दिया चौधरी(महाराष्ट्र) वि.वि. रिया सचदेव(4)(दिल्ली) 6-4, 7-5, चार्मी गोपिनाथ(12)(कर्नाटक) वि.वि रिधि पोका(8)(आंध्र प्रदेश) 7-5, 6-2, श्रावणी खवळे(9) (महाराष्ट्र) वि.वि सौम्या रोंडे(5)(तेलंगणा) 6-3, 7-5, खुशी शर्मा(6) (महाराष्ट्र) वि.वि अलिशा देवगावकर(महाराष्ट्र) 6-2, 6-2, सोनल पाटील(7)(महाराष्ट्र) वि.वि स्वरा काटकर(महाराष्ट्र) 6-2, 6-2, परी चव्हाण(3)(महाराष्ट्र)वि.वि. श्रीनिधी अमीरेड्डी(तेलंगणा) 6-1, 6-2 , रुमा गाईकैवारी(2) (महाराष्ट्र)वि.वि. निराली पदानीया(तेलंगणा)6-2, 6-0.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)